गाडगेबाबा जयंतीच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या प्रांगणात सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कायद्याचे अभ्यासक जागतिक चेवनिंग फेलो एड.दीपक चटप तसेच मुक्त पत्रकार अविनाश पोईंनकर यांनी विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणानंतर तसेच पदवी शिक्षणानंतर विविध शिष्यवृत्तीच्या परीक्षा आणि उच्च शिक्षणासाठी दर्जेदार शिक्षण संस्थांचा परिचय या कार्यक्रमात करून दिला. गरीबी आणि माहितीचा अभाव या दोन कारणांमुळे प्रचंड क्षमता असून सुद्धा ग्रामीण भागातील आत्मविश्वास असणारे होतकरू विद्यार्थी मागे पडतात. त्यांना शिक्षणासाठी योग्य दिशा मिळावी आणि मदत व्हावी म्हणून शिक्षण यात्रा हे जिल्हा परिषद चंद्रपूरच्या माध्यमातून काढण्यात आलेली होती. गाडगेबाबा जयंतीच्या निमित्ताने गाडगेबाबांच्या स्मृतींना अभिवादन करून प्रस्तुत कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ सुरेश बाकरे यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ.ललित उजडे हे उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.गजानन कोर्तलवार यांनी प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय करून दिला. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन बीए तृतीय वर्षाचा विद्यार्थी टोनी रामटेके यांनी केले. तर आभार बीए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी अनिकेत ठाकरे यांनी मांनले.