श्री ज्ञानेश महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना सामाजिक भान यावे यासाठी वेळो वेळी विविध उपक्रम राबविले जाते. विद्यापीठ आणि शासन यांच्या निर्देशाप्रमाने आपण विविध उद्दिष्टे गाठण्यासाठी महाविद्यालयात नियमित उपक्रम व विशेष वार्षिक शिबीर या मार्फत अनेक कार्यक्रम आपण राबवीत असतो. राष्ट्रीय सेवा योजनेचे फार महत्वाचे उद्दिष्ट म्हणजे राष्ट्रीय एकात्मता. या मूल्याचा प्रसार व विकास करणे तसेच त्यांच्यात सामाजिक भान यावे म्हणून 26 व 27 फेब्रुवारी 2024 असे दोन दिवड समाजभान कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. त्यांच्यात हे भान सतत तेवत ठेवण्यासठी समाजभानकार्यशाळेचे मार्गदर्शक डॉ.समान शेखर व डॉ.संजय शेंडे यांनी नागपूर येथे आयोजनात सहकार्य केलेले आहे. MOVEMENT21 या समाजभान जागवणाऱ्या चळवळी मार्फत. राष्ट्रीय एकात्मता, संविधानमूल्ये आणि मानवी जीवनमूल्यांच्या अनुशंगाने बौद्धिक सत्र ठेवण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकासाठी MOVEMENT21 ही संस्था विशेष उपक्रम दरवर्षी ते राबवित असतात. त्याचाच एक भाग म्हणून प्रस्तुत समाजभान कार्यशाळेचे आयोजन दि.२६/०२/२०२४ रोजी करण्यात आले होते. या कार्यशाळेत एकूण 32 स्वयंसेवक सहभागी झाले होते.या कार्यशाळेत तीन बौद्धिक सत्रात डॉ.समान शेखर यांनी खालील विषयावर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमअधिकारी डॉ.गजानन कोर्तलवार यांनी या कार्यशाळेच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले.
1. भारताचा सामजिक, सांकृतिक, राजकीय आणि इतिहास
2. भारताचे संविधान आणि आपली जबाबदारी
3. मानवी जीवनमूल्य आणि त्याचे उपयोजन याचे भान
अभ्याससहल
दि.27 फेब्रुवारी 2024 रोजी 10 ते साय 4 पर्यंत नागपुरातील
दीक्षाभूमी, रमणविज्ञान केंद्र, स्वामी नारायण मंदिर इत्यादी स्थळांना भेट देऊन विद्यार्थ्यांची अभ्यास सहल पूर्ण करण्यात आली.