श्री ज्ञानेश महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शुक्रवार दि.05/04/2024 महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये सकाळी ठीक ८ वाजता महाविद्यालयात उपस्थित सर्व विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक हे मतदार जनजागृती या कार्यक्रमात सहभागी होते. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्याचे शासन आणि गोंडवाना विद्यापीठाकडून प्राप्त निर्देशानुसार विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.ललित उजेडे यांनी निरपेक्ष व निकोप असे मतदान व्हावे यासाठी जात, धर्म, प्रदेश, भाषा या पलीकडे जाऊन नागरिक म्हणून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याविषयी विद्यार्थ्यांना शपथ दिली. या वेळी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.गजानन कोर्तलवार यांनी विद्यार्थ्यांना या वेळी मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि आभार मानले.